लातुर : स्वामी विवेकानंद यांच्या जयंती च्या दिवशी दिनांक १२ जानेवारी रोजी सर्वसामान्य जनतेच्या न्यायहक्कासाठी लोकाधिकार या महाराष्ट्रव्यापी संघटनेची स्थापना करण्यात आल्याची घोषणा लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी एका कार्यक्रमात केली.
हरंगुळ (बु) येथे अतिरिक्त एमआयडीसीमध्ये व्यंकटराव पनाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने १२ जानेवारी रोजी झालेल्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमात व्यंकटराव पनाळे यांनी *लोकाधिकार संघ* या संघटनेची स्थापना केल्याची अधिकृत घोषणा केली.
तसेच लवकरच तालुका व जिल्हा स्तरावरील लोकाधिकार संघटनेचे पदाधिकारी घोषित करण्यात येतील असेही लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी जाहीर केले.