वागदरी , दि.१६ : एस.के.गायकवाड
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या २८ व्या नामविस्तार वर्धापन दिनाचे औचित्य साधून मौजे वागदरी ता.तुळजापूर येथे पंचशील बुद्ध विहार कमिटीच्या नामफलकाचे अनावरण करून कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी रिपाइंचे(आठवले) तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शुभेदार दिगंबर बनसोडे, माजी सैनिक मधुकर लोखंडे, कृष्णा वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते दत्ता सुरवसे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून शुभेदार दिगंबर बनसोडे यांच्या हस्ते पंचशील बुद्ध विहार कमिटीच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
याकार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन एस.के.गायकवाड यांनी तर आभार महादेव वाघमारे यांनी केले.
यावेळी निवडण्यात आलेली पंचशील बुद्ध विहार कमिटीची कार्यकारणी पुढील प्रमाणे,अध्यक्ष नागनाथ बनसोडे, उपाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, अकाश झेंडारे, सचिव एस.के.गायकवाड, सहसचिव रमेश वाघमारे,कार्याध्यक्ष सहदेव वाघमारे, कोषाध्यक्ष भारत गोपीनाथ वाघमारे, कार्यकारणी सदस्य रावसाहेब वाघमारे, महादेव वाघमारे, सल्लागार मधुकर वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, अनिल वाघमारे, उत्तम झेंडारे, मोहन वाघमारे, वाल्मिक वाघमारे आदीची निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी हणमंत वाघमारे,दत्तात्रय झेंडारे, पांडुरंग बनसोडे लक्ष्मण झेंडारे शिवाजी वाघमारे, कुंडलीक वाघमारे,उज्ज्वला वाघमारे,ठकुबाई वाघमारे, श्रीदेवी वाघमारे, कविता गायकवाड,वंदना वाघमारे, कमल धाडवे, कविता वाघमारे,सह महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.शेवटी सामुहिकरित्या तिळगुळ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.