तुळजापूर दि 16 : सतीश महामुनी
विश्व हिंदु परिषदेच्या वतीने तुळजापूर येथे अयोध्या येथील राम मंदिर उभारणीसाठी देशभर सुरू असलेल्या अभियानाअंतर्गत शोभायात्रा काढण्यात आली. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी शोभायात्रेची सुरुवात केली.
विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाला समाजातील दानशूर व्यक्ती चे मदत घेण्यासाठी निधी संकलन करण्याचे काम सुरू झाले आहे. या अंतर्गत तुळजापूर येथे शनिवारी सकाळी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा करून विश्व हिंदू परिषदेचे शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेचे उद्घाटन महंत मावजीनाथ महाराज, महंत अरण्यगिरी महाराज, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी रावसाहेब कुलकर्णी, प्रदेश भाजपाचे सदस्य ॲड. अनिल काळे, प्राधिकरण सदस्य नागेश नाईक, जिल्हा चिटणीस भाजपा गुलचंद व्यवहारे, जिल्हा समन्वयक ॲड. विक्रम साळुंखे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.क्रांती थिटे, जिल्हा मातृशक्ती प्रमुख विश्व हिंदू परिषद प्रभावती मार्डीकर, प्रखंड मातृशक्ती प्रमुख छाया लोंढे, संस्कार भारती अध्यक्ष पद्माकर मोकाशे, लक्ष्मीकांत सुलाखे, अविनाश धट, शिवबा राजे प्रतिष्ठान अध्यक्ष अर्जुनआप्पा साळुंखे, इंद्रजित साळुंके, सचिन सूर्यवंशी, श्रीकांत कावरे, छावाचे शहराध्यक्ष कुमार टोले, अण्णासाहेब क्षीरसागर, महेंद्रा देशमुख, ॲड. जनक पाटील, आनंद कंदले, गिरीश देवलालकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
विश्व हिंदु परिषदेच्या वतीने या शोभायात्रेच्या निमित्ताने तुळजापूर शहर आणि तालुक्यात राम मंदिर उभारण्यासाठी देणगी स्वीकारण्याचे काम केले जाणार आहे दरम्यान समाजातील सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने देणगी देण्याचे आवाहन जिल्हा मंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी यांनी केले आहे.
शोभायात्रेत प्रभू रामचंद्र सीता आणि हनुमान यांची वेशभूषा केलेले बालकलाकार अग्रभागी होते , रुद्र पाठक (राम), संहिता पाठक ( सीता ), हर्ष पाठक ( लक्ष्मण ), श्लोक कावरे ( बाल हनुमान ) यांचा सहभाग होता.