नळदुर्ग, दि. 05 : येथील आदर्श शिक्षक व काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने मंगळवार दि. 5 जानेवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता नळदुर्ग शहरातील चावडी चौकात सामुदायिक सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली. संजय दळवी हे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य केल्याचे सांगुन त्यांच्या कार्याविषयी भुतकाळातील आठवणींना श्रध्दांजलीपर बोलताना अनेकांनी उजाळा दिला. 

काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष, सहशिक्षक संजय दळवी यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान रुग्णालयात वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात्त पत्नी, दोन मुले, आई, विवाहित बहिणी असा परिवार आहे.  मंगळवारी नळदुर्ग शहरातील चावडी चौकात सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, जिल्हा संघटक किशोर राऊत, नगरसेवक विनायक अहकारी , शहबाज काझी, उदय जगदाळे ,नितीन कासार, महालिंग स्वामी, नवल जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, शिवसेनेचे सुनिल गव्हाणे, ज्ञानेश्वर घोडके, माजी नगरसेवक संजय बताले,  सुधीर हजारे, मारुती खारवे, पत्रकार विलास येडगे,शिवाजी नाईक, सुहास येडगे, उत्तम बणजगोळे ,नळदुर्ग शहराध्यक्ष सुभाष महाबोले, बाळु महाबोले, संदिप सुरवसे, राजेंद्र महाबोले, समिर सुरवसे, नेताजी महाबोले, माने सहदेव, सचिन सुरवसे, राहुल कुलकर्णी, महेंद्र डुकरे आदिजण उपस्थित होते.

 
Top