तुळजापूर, दि. 05 : श्री तुळजाभवानी मंदिरात नियमाचे उल्लंघन करणा-या श्री तुळजाभवानी मातेच्या 24 पुजा-यांविरुध्द श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने कारवाई केली आहे. यामध्ये 8 पुजा-यांना तीन महिने मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आले आहे. तर 16 पुजा-यांना आपणास 6 महिन्यासाठी मंदिरात प्रवेश बंदी का करु नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगाकर यांच्या आदेशान्वये तहसिलदार सौदागर तांदळे यांनी सदरील कारवाई केली आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन केल्याने देऊळ ए कवायत कायदानुसार सदरील कारवाई करण्यात आली आहे. मंदिरात पूजेची पाळी नसतानाही तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात विनापरवाना प्रवेश केल्या प्रकरणी 16 पुजाऱ्यांना 6 महिने मंदिर प्रवेश का करू नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे.