तुळजापूर शहरामध्ये प्रसिद्ध असणारी संक्रांतीच्या सणाला बाजारात येणारी गुळाची रेवडी आणि साखरेचा हलवा बाजारात दाखल झाला आहे, अनेक वर्षापासून परंपरागत पिढीजात संक्रांतीचा हलवा प्रसिद्ध आहे.
तीर्थ क्षेत्र असणाऱ्या तुळजापूर शहरांमध्ये परंपरागत पद्धतीने वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळी उत्पादने सण आणि उत्सवाच्या निमित्ताने मिळतात यामध्ये दिवंगत अंबादासराव गवते यांनी प्रदीर्घ काळ अत्यंत सचोटीने व्यवसाय करून देवीच्या प्रासादिक वस्तू आणि हिंदू सोडणारा मध्ये मिळणाऱ्या सर्व साखरेच्या उत्पादनांची ची कीर्ती निर्माण केली आहे.
साखरे पासून बनवलेले हलव्याचे दागिने, गुळाची रेवडी, तिळाचा हलवा घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी सुरू झाली आहे, संक्रातीच्या सणासाठी गवती यांचीही अनेक वर्षापासून लोकमान्यता मिळवलेली उत्पादने असून ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पुढील संक्रातीच्या सालापर्यंत गर्दी राहणार आहे. सोन्याच्या निमित्ताने गुळाची रेवडी १२० रुपये किलो आणि साखरेचा हलवा ६० रुपये किलो या दराने विक्रीस ठेवण्यात आलेला आहे. ९८६०५४२३३२ या मोबाईल क्रमांकावर ग्राहकांना या परंपरागत दागिने आणि साखरेचा हलवा, गुळाची रेवडीची माहिती मिळणार आहे.
तुळजापूर येथील गवते घराण्याकडे हिंदू धर्मातील वेळा सणांमध्ये साखरेच्या अलंकार आणि गुढीपाडव्याचे साखरेचे हार तसेच वेगवेगळ्या सणाला पूजेसाठी उपयोगी पडणारे साहित्य बनण्याची परंपरा आहे ही आजही मागील ११० वर्षापासून अखंडपणे सुरू आहे.
आमच्या आजी भीमाबाई गवते, वडील दिवंगत अंबादासराव गवते यांनी साठ वर्ष व्यवसाय करून या रेवडीला लोकप्रियता मिळवून दिली आहे, ही परंपरा आजही सुरू आहे.
- उमेश अंबादासराव गवते, व्यापारी, श्री क्षेत्र तुळजापूर.