जळकोट, दि.१५ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण सहा वार्डमधून असलेल्या १७जागेसाठी एकूण ३६ उमेदवार उभे आहेत.दि.१५ रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण ७४.९४% मतदान झाले.
जळकोट ग्रामपंचायतीमध्ये एकूण ६ वार्ड असून एकूण १७सदस्य निवडीसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत दोन पॅनल मधून एकूण ३४ उमेदवार तर दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. जिल्हा परिषद प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संभाजीनगर येथे प्रशासनाने मतदारासाठी बुथ रचना आखली होती. जळकोटमध्ये एकूण ६३९७ एकूण मतदार असून , यापैकी४१९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
प्रत्यक्ष वार्ड निहाय झालेले मतदान असे - वार्ड क्रमांक-१ - ७७७ पैकी ६०४, वार्ड क्रमांक -२-१०२० पैकी ७६५, वार्ड क्रमांक तीन १२०२ पैकी९१४, वार्ड क्रमांक चार ९८० पैकी६९६, वार्ड क्रमांक पाच १२९४ पैकी९२० व वार्ड क्रमांक सहा ११२४ पैकी ८९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जळकोट ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पॅनलमध्ये तुल्यबळ लढत पाहावयास मिळत आहे. दोन अपक्ष उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.दि.१८ रोजी निवडणूक निकाल लागल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.