काळेगाव : प्रकाश साखरे
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ या निवडणुकीत तुळजापुर तालुक्यातील काळेगाव ग्रामपंचायतचा ही समावेश आहे. या निवडणुकीत दोन पॅनल मध्ये चुरशीची लढत लागली आहे.
पॅनल क्रमांक १ हे श्री संगमेश्वर विधायक महापरिवर्तन विकास पॅनल काळेगाव असून या पॅनल चे प्रमुख खंडु नाना उंबरे आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक- १ मध्ये खंडु नाना उंबरे, केशराबाई चंद्रहार शिंदे व अनिता धनाजी मुळे तर प्रभाग क्रमांक-२ मध्ये सतिश काशिनाथ मुळे व संगिता मधुकर घाडगे, तर प्रभाग क्रमांक-३ मध्ये आप्पासाहेब नामदेव साखरे व रेखा अंबादास साखरे हे उमेदवार उभे आहेत तर यांची चिन्हे बॅट, गॅस सिलेंडर व सिलिंग फॅन आहे हे आहेत.
तर यांच्या विरोधात म्हणजेच पॅनल क्रमांक -२ ग्रामविकास परिवर्तन पॅनल काळेगाव असून या पॅनल चे प्रमुख आनंदराव विनायक उंबरे पाटील आहेत. प्रभाग क्रमांक -१ मध्ये आनंदराव विनायक उंबरे पाटील, मनिषा बालाजी मुळे व सुमन अशोक गडदे तर प्रभाग क्रमांक-२ मध्ये विशाल रामचंद्र मुळे व मनिषा सुधाकर जाधव तसेच प्रभाग क्रमांक-३ मध्ये शुभांगी बाबु भोवाळ व तुकाराम नागनाथ जेटीथोर हे उमेदवार उभे आहेत यांची निशाणी- नारळ, रिक्षा व नगारा अशी आहेत.
दोन उमेदवार प्रभाग क्रमांक ३ साठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा चालू असली तरीही दोन पॅनल मध्ये चुरशीची लढत असल्याची पहायला मिळत आहे. त्याच बरोबर सरपंच पदासाठी आरक्षण हे अनुसूचित जाती साठी लागणार असल्याची चर्चा असल्याने संपूर्ण गावची नजर प्रभाग क्रमांक - ३वर लागली आहे. त्यामुळे दोन्ही पॅनल च्या वतीने प्रभाग क्रमांक ३ साठी कंबर कसली आहे.