जळकोट : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील लोकमंगल मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटी जळकोट शाखेच्यावतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनादिवशी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

लोकमंगल उद्योग समूहाचे रोहन देशमुख यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. जळकोट येथील लोकमंगल मल्टीस्टेटच्या शाखा कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात जळकोट गावातील विविध वर्तमानपत्रांच्या पत्रकारांचा शुभेच्छापत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यात पत्रकार मेघराज किलजे, विरभद्र पिसे, संजय रेणुके, संजय पिसे, अरुण लोखंडे, बालाजी कुंभार, मनीषा गायकवाड या पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य व लोकमंगल मल्टीस्टेट शाखा सल्लागार कस्तुरा कारभारी, सल्लागार किसन राठोड, शाखाधिकारी एस.सी. कुलकर्णी, कॅशियर एस.वाय. काटे, लिपिक एम.के. शेख,माजी कर्मचारी रमेश कलशेट्टी आदीसह कर्मचारी उपस्थित होते.

 
Top