संग्रहित छायाचित्र


 नळदुर्ग, दि.२० : विलास येडगे

काही कोंबडया आचानक मरण पावल्याची तर काही कोंबड्या आजारी असल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे मंगळवारी उघडकीस आल्याने सर्वञ  एकच खळबळ उडाली आहे.  या घटनेची माहिती मिळताच तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी बुधवारी गंधोरा  गावला भेट देवून परिस्थितीची पाहणी केली आहे.

 दरम्यान या ठिकाणच्या चार कोंबडया पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवून दिले  आसल्याची माहीती मिळाली आहे. 

सध्या बर्डफ्लु मोठया प्रमाणात पसरत आहे. मराठवाडयात त्याच बरोबर लातूर जिल्हयात ही या रोगाचा प्रादुर्भाव झाला आसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या रोगाबाबत प्रशासन सतर्क राहीले आहे. अशातच तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावात मंगळवार  दि. १९ जानेवारी रोजी आचानक दहा कोंबडया मरण पावल्या आहेत. तर आठ कोंबडया आजारी आहेत, त्यामुळे या बर्डफ्लु सारख्या आजाराचा संसर्ग तर झाला नाही ना ? या चिंतेत येथील नागरीक आहेत. दरम्यान कोंबड्या मरण पावल्याची बातमी गावातील नागरीकांनी तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांना देताच या गावाला तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी दि. २० जानेवारी रोजी भेट देवून परिस्थीतीची पहाणी केली आहे. दरम्यान आजारी पडलेल्या आठ कोंबडयामधील चार कोंबडया पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवून देण्यासाठी घेतल्या आहेत. यावेळी तालुका पशुसंवर्धन अधिकारी एम. ए. सादगिरे, सलगरा दिवटीचे पशुविकास अधिकारी बी. एम. खरोसे यांनी या कोंबडया पूण्याला पाठवून दिल्या आहेत. दरम्यान या घटनेने नागरीकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

तुळजापूर तालुक्यात ही बर्डफ्लु सारख्या आजाराचा संसर्ग तर झाला नसेल या बाबत तर्क वितर्क काढण्यात येत आहेत. मात्र सध्या तरी या रोगाच्या बाबतीत संबंधीत अधिकाऱ्यांनी मात्र याला दुजोरा दिला नाही.मरण पावलेल्या कोंबड्याचा रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत खरी माहिती समोर येणार आहे. त्यामुळे पुण्याला प्रयोगशाळेत कोंबडया तपासून त्यांचा अहवाल येई पर्यंत कोणताही तर्क वितर्क करणे चुकीचे आहे. त्यामुळे प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत मरण पावलेल्या कोंबडया कशाने मरण पावल्या आहेत हे सांगता येणार नाही. यावेळी गंधोरा येथील प्रतिष्ठीत नागरीक संतोष मुसळे ही उपस्थित  होते.

 
Top