नळदुर्ग : विलास येडगे
सालाबादाप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग शहर पत्रकार संघाने वार्षिक दिनदर्शिका २०२१ ही काढली आहे. या दिनदर्शिकेचे दि.२६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत नळदुर्ग (मैलारपुर) येथील श्री खंडोबा मंदिरात झाले.
या कार्यक्रमास नगरसेवक शाहाबाज काझी,बसवराज धरणे, नितीन कासार, महालिंग स्वामी,विनायक अहंकारी, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक सुधीर हजारी,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव,मारुती खारवे, प्रा. डॉ. सुभाष राठोड, बंडप्पा कसेकर, रघुनाथ नागणे, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अरुण मोकाशे, पत्रकार शिवाजी नाईक, आदीजन उपस्थित होते.
प्रारंभी पत्रकार व सर्व मान्यवरांचा खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने फेटा बांधुन सत्कार करण्यात आला. यानंतर नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वार्षिक दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचा शहर पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांनी म्हटले की,नळदुर्ग शहर पत्रकार संघाचा सलग १७ वर्षे वार्षिक दिनदर्शिका काढण्याचा उपक्रम स्तुत्य व समाजपयोगी आहे. ही दिनदर्शिका आपल्या परिसरातील सर्व धर्मियांचे सण, उत्सव, जयंत्या, उर्स या दिनदर्शिकेत आहे त्यामुळे ही दिनदर्शिकासर्वानाच हवीशी वाटते त्यामुळे या दिनदर्शिकेची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. नळदुर्ग शहरातील पत्रकारांचे शहर विकासात मोठे योगदान आहे त्याचबरोबर सामाजिक कार्यातही पत्रकारांचा मोठा सहभाग आहे.असेही कमलाकर चव्हाण यांनी म्हटले आहे.
यावेळी नगरसेवक शाहबाज काझी, विनायक अहंकारी यांनीही शहर पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव करून पत्रकार संघाच्या दिनदर्शिका काढण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे,सचिव गुरुनाथ कबाडे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, लतीफ शेख, प्रा. डॉ. दीपक जगदाळे यांनी परीश्रम घेतले.