तुळजापूर : सतीश महामुनी

तुळजाभवानी देवीच्या भाविकांना दर्शन देण्याची मर्यादा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 12 हजार वरून ३०  हजारापर्यंत वाढवली आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे

तुळजाभवानी मंदिर संस्थान चे अध्यक्ष डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांची विश्वस्त व आमदार राणाजगजितसिंह पाटील व तुळजापूरच्या नगराध्यक्ष सचिन रोजकरी यांनी भेट घेऊन भाविकांची संख्या वाढविण्यासाठी चर्चा केली यापूर्वीदेखील ही मागणी करण्यात आली होती वेगवेगळ्या संघटनांनी ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे यापुर्वी केलेली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी 12 हजार  संख्येवरून ३०  हजार भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे

सशुल्क दर्शन ३०० रुपये आकारण्यात येत आहे त्यामध्ये बदल करून २०० रुपये करण्याचा निर्णय झाला आहे ही संख्या ५०० भाविकांनी वाढवण्यात आली आहे त्यामुळे २५०० भाविकांना दोनशे रुपये प्रमाणे दर्शन दिले जाईल,  देवीचे कुळधर्म कुलाचार अभिषेक गोंधळ सारखे विधी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दाखवली आहेत मात्र सुरू करण्यात आल्याची घोषणा केलेली नाही विश्वस्त तहसीलदार सौदागर तांदळे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, अभियंता भोसले, अभियंता प्रवीण अमृतराव यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 
Top