मुरूम, दि. ०४ : येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे यंदाचे १२ वे वर्ष असून पतसंस्थेला उत्कृष्ट संस्था चालविल्याबद्ल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनकडून विभागीय पातळीवर सलग दोन वर्षापासून पतसंस्थेला पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. गेल्या आर्थिक वर्षात या पतसंस्थेस ३९ लाख १४ हजार ३५४ रुपयाचा निव्वळ नफा झाल्याचे संस्थापक अध्यक्ष शिवशरण वरनाळे यांनी माहिती दिली. 

पतसंस्थेकडे यंदा ९२ लाख ९७ हजार ६०० रुपयाचे वसुल भाग भांडवल, ७ कोटी १ लाख ५० हजार ९२३ रुपयाच्या ठेवी, संस्थेने ६ कोटी २२ लाख २३ हजार ५३० रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची गुंतवणूक २ कोटी ७६ लाख ८६ हजार ८४३ रुपये असून या संस्थेचे ३४३२ सभासद आहेत. ऑडीट वर्ग 'अ' दर्जा प्राप्त असून संपूर्ण संगणकीकृत पतसंस्था आहे. 

ठेवीवरील आकर्षक व्याजदर योजना यात महालक्ष्मी लखपती योजना, गणेश युवा मंगल योजना, स्वप्नपुर्ती योजना, सरस्वती मासिक प्राप्ती ठेव योजना, महावितरण कंपनीचे वीज बील भरणा केंद्र, मुरुम व उमरगा, १३ टक्के सोने तारण कर्ज तर १४ टक्के इतर तारण कर्ज आदी सोयी ग्राहकांच्या फायदयासाठी संस्थेकडून पुरविल्या जातात. 

या पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव व सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापक दत्तात्रय कांबळे, कॅशिअर चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, संतोष स्वामी, युवराज शिंदे आदींसह कर्मचारीवृंद व सभासद यांच्या सहकार्यांने पतसंस्था यशस्वीरित्या वाटचाल करीत असून सध्या या पतसंस्थेचे नेहरू नगर, बसस्थानकाजवळ तीन मजली बांधकाम अंतिम टप्प्यात सुरु आहे. कोरोनामुळे कर्ज वाटप मंदावले, ठेवीमध्ये वाढ, थकीत कर्जदारांची वसुली देखील सुरू असून यंदा कोरोना संसर्गामुळे पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार नसल्याचे सांगून यंदा सभासदांना ७ टक्के लाभांश देण्याचे ठरले असल्याची माहिती चेअरमन शिवशरण वरनाळे यांनी दिली.

 
Top