मुरुम, दि. 04 :
येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्ञ विभाग व अँडव्हाईज कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणुक  साक्षरता या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा सोमवार (दि. ४) रोजी आयोजित करण्यात आली. 

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डाॅ.चंद्रकांत बिराजदार होते.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुमीत कुलकर्णी यांनी भागबाजाराची ओळख, कार्यप्रणाली, घटक, गुंतवणुक का, कशी व कुठे करावी. गुंतवणुक करणे किती गरजेचे आहे व त्याच बरोबर त्यामध्ये येणा-या समस्या, गुंतवणुक ही कोणत्या ठिकाणी करणे फायदेशीर ठरते. यासंदर्भाने गुंतवणुकीचे विविध उपलब्ध असणारे पर्याय व नवीन पिढीने म्युच्युवल फंडामध्ये गुंतवणुक करणे किती फायदेशीर आहे. एसआयपी,आरोग्य विमा, फिक्स डिपाॅझीट, पोष्टातील गुंतवणुक, भविष्य निर्वाह निधी, सोन्यातील गुंतवणुक, रिअल स्टेट, स्टाॅक मार्केट इत्यादी विषयावर सखोल असे मार्गदर्शन अँडव्हाॅईज फायनान्सिअलचे संचालक सुमीत कुलकर्णी यांनी केले. 

या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ.रविंद्र गायकवाड, प्रा.डाॅ.सुधीर पंचगल्ले, प्रा.दयानंद बिराजदार, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डाॅ.राजेंद्र गणापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.   संगणक विभागाचे प्रा. सचिन राजमाने, प्रा.लक्ष्मण पवार, प्रा.डाॅ.रवी आळंगे आदींनी पुढाकार घेतला. वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top