जळकोट : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील अल्पभूधारक शेतकरी माणिक सालगे यांनी सेंद्रिय पद्धतीने ऊस  पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.

दोन  एकर जमिनीत ८६:०:३२ या जातीचे ऊस लागवड केली होती. रासायनिक खताचा वापर न करता त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती कसली.  दोन एकर जमिनीतून त्यांनी दीडशे  टन ऊस उत्पादन घेऊन यातून लाखो रुपये कमावले आहेत. 

या शेतकऱ्याने दोन एकरात १५०  टन उसाचे उत्पन्न घेतल्याबद्दल  खुदावाडी येथील युवा शेतकऱ्याने माणिक  सालगे  या आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे. याप्रसंगी भास्कर व्हलदुरे, सहदेव जवळगे, आंदाप्पा कापसे, ओंकार कबाडे, संतोष कवडे, किरण घोडके, मंगेश जवळगे, संतोष कबाडे, पांडुरंग व्हलदुरे यांच्यासह युवा शेतकरी उपस्थित होते. खुदावाडीसह परिसरातील शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याची प्रेरणा घेऊन शेती करावी. असे मनोगत अनेकांनी या वेळी व्यक्त केली.

 
Top