तुळजापूर, दि १४ : सतीश महामुनी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद  कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुळजापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन जिल्हा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रिपाइंच्या वतीने दिले असून त्यावर सरचिटणीस तानाजी कदम, तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, नगरसेविका सौ वैशाली कदम,  शहर अध्यक्ष अरुण कदम, श्रमिक तालुका अध्यक्ष अप्पा कदम,सचिव तानाजी गावडे, उपाध्यक्ष महादेव सोनवणे, तालुका संघटक वैजिनाथ पांडागळे, सल्लागार तानाजी दाजी कदम, शुभम कदम, विजय गायकवाड, भागवत कदम, प्रताप कदम यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कमी केलेली सुरक्षा पुन्हा वाढवण्यात यावी अशी मागणीही या निवेदनात आहे.

 
Top