तुळजापूर : सतीश महामुनी

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन  उत्साहात साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शेखर जगदे हे होते तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य प्रा. रवी मुदकना व प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा.प्रदीप हंगरगेकर हे उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर प्रा. वैभव पानसरे ,प्रा.प्रदीप हंगरगेकर, प्रा. अर्चना देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.जगदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा सांगून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो प्रमुख प्रा.शामकांत डोईजोडे  यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विवेक गंगणे यांनी मानले .या कार्यक्रमास प्रबंधिका सुजाता कोळी, माजी प्राचार्य डॉ.  पेरगाड, डॉ.धनंजय खुमणे,सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top