अणदूर , दि.१४: येथील जयमल्हार पत्रकार संघाच्या वार्षिक दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन निलकंटेश्वर मठाचे मठाधिपती श्री श्री शिवयोगी शिवाचार्य महास्वामी जी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
प्रतिवर्षी संघाची ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते एका छोटेखानी समारंभात ही दिनदर्शिका महास्वामीजीं यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली ,संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात त्याचाच एक भाग असलेली दिनदर्शिका मोफत संपूर्ण गावात देण्यात येते, त्याचे प्रकाशन आज रोजी करण्यात आले.
या वेळी पत्रकार दयानंद काळुंके यांनी संघाच्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली,
"जयमल्हार पत्रकार संघ हा नुसत्या बातम्या लिहीत नसून, अणदूर व परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे ही भूषणावह गोष्ट असून कोरोना काळात या पत्रकार संघाचे काम मोलाचे होते".असे गौरव उदगार महास्वामीजीं यांनी या प्रसंगी केले,
या वेळी पत्रकार चंद्रकांत हागलगुंडे, अजय अणदूरकर,चंद्रकांत गुड्डू,शिवशंकर तिरगुळे, संजीव आलूरे, सचिन तोग्गी, सचिन गायकवाड, लक्ष्मण दुपारगुडे, सुदर्शन मोकाशे आदी पत्रकार उपस्थित होते