नळदुर्ग ,दि.१४: एस.के.गायकवाड

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) गट तुळजापूर च्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा २८ वा नामविस्तार वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने  साजरा करण्यात आला.

 याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत सलग्न सर्व महाविद्यालयाच्या प्रागंनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याची  मागणी करण्यात आली.

    प्रारंभी तुळजापूरातील   महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले.

 यावेळी नामविस्तार दिनाचे औचित्य साधुन जागतिक पातळीवरील विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असलेले ज्ञानाचे प्रतिक म्हणून या विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर या़ंचा पुतळा बसवावा व रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांना पुर्ववत झेड सुरक्षा द्यावी या मागणीचे निवेदन  मुख्यमंत्री  यांना तुळजापूर तहसीलदार मार्फत देण्यात आले. 
  रिपाइंच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे  जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,  तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, शहराध्यक्ष अरूण कदम, रिपाइंच्या नगरसेविका वैशाली कदम, रिपाइंचे आप्पा कदम,वैजिनाथ पांडागळे, विजय गायकवाड,प्रताप कदम,भावत कदम,महदेव सोनवणे, सुभाष कदम,तानाजी गावडे, तानाजी उमाजी कदम, महादेव जेटीथोर, अकाश मस्के आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
 
Top