कळंब, दि. 04 : महा आवास अभियान कालावधीत केंद्र व राज्य पुरस्कृत योजने मधील सर्व घरकुले तात्काळ पूर्ण करा व पात्र बेघर लाभार्थीस घर उपलब्ध करून देण्याच्या सुचना जि.प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नवाळे ए.जी. यांनी दिल्या आहेत.

दि. 02 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासन द्वारे दि. 20 नोव्हेबर ते 28 फेब्रवारीपर्यंत 100 दिवसाचे महा आवास अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने  प्रकल्प संचालक तथा अति मुख्य कार्यकारी अधिकारी नवाळे  यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती कळंब येथे केंद्र व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना अंतर्गत महा आवास अभियान मधील सर्व मुद्दा निहाय मार्गदर्शन करून बेघर पात्र लाभार्थीस पक्के घरकुल विहित मुदतीत बांधण्या करीता तालुका स्तरीय यंत्रणेस सूचना देण्यात आल्या.

यामध्ये सर्व मुद्यांच्या अनुषंगाने म्हणजेच 100% घरकुल मंजुरी, अपूर्ण घरकुले पूर्ण करणे, पात्र परंतु स्वतःची जागा नाही अशा लाभार्थी यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजने मधून लाभ देऊन जागा उपलब्ध करून देणे, इ. बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राजगुरू एन. पी. गट विकास अधिकारी पं. स. कळंब,  मेघराज पवार जिल्हा प्रोग्रामर,शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, संबंधित कर्मचारी, ग्रामीण गृह निर्माण अभियंते, डेटा एन्ट्री ऑपरेटर उपस्थित होते.

 
Top