नळदुर्ग, दि.१६ :   शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या बसस्थानक ते किल्लागेट या रस्त्यावर आनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. चार वार्षापूर्वी रस्ता  बनवताना वापरलेली खडी संपूर्ण रस्त्यावर पसरली असून यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींचे  याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर पडलेली खडी वेळीच हटवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. विशेषतः जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे २६ डिसेंबर रोजी पहिल्यांदाच नळदुर्ग किल्ला पाहण्यास आले असता त्यांना या खराब रस्त्याचा अनुभव आला व याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत पालिकेला एवढा निधी येत असताना रस्त्याची दुरवस्था का? असा सवाल करत सिमेंट रस्ता बनवण्याची सुचना केली.
 शहरातील मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्त्यांचीही आवस्था वाईट असून  रहीम नगर येथे तर आद्याप रस्ते गटारी सुद्धा बनवण्यात आले नाहीत तसेच चावडी चौक ते मराठा गल्ली येथील रस्ता आनेक वर्षापासून बनवण्यात आला नसल्यामुळे या रस्त्यावरून चालनेही कठीण झाले आहे.
    शहरातील लोकमान्य वाचनालय समोरील बस स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता, बालाघाट महाविद्यालय ते नानिमाँ मार्गे शहरास जोडणारा रस्ता व नगरपालिका ते माऊली नगर या सिमेंट मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सत्ताधारी वर्गातील गटबाजी, राजकीय वाद, निष्क्रिय विरोधक,  कंञाटदाराकडून विलंब आदी बाबीमुळे या रस्त्याचे कंञाट निघूनही काम झाले नाही. पुढील सहा महिन्यात नगरपालिकेची सार्वत्रिक  निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते यामुळे शहरातील मुख्य व अंतर्गत  रस्ते या वर्षी तरी होणार का असा सवाल विचारला जात आहे.
 
Top