नळदुर्ग : एस.के. गायकवाड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी ता. तुळजापूर येथे स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
दि. ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जि.प. प्राथमिक शाळा वागदरी येथे अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लक्ष्मी चिनगुंडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून आभिवादन करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी मदतनीस रुपाली जाधव, विनोद पवार, सतिश बिराजदार, बाळासाहेब पवार, रामसिंग परिहार, शाम जाधव सह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.