नळदुर्ग, दि. 07 : येथील भीमनगर मध्ये राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अंगणवाडीत साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमित दमकोंडवार तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड, महिला व बाल विकास विभागाच्या सुपरवायझर कांबळे आदी उपस्थित होते. उपस्थित महिलाना यावेळी स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. स्त्रीभ्रुण हत्या याबाबत प्रबोधनात्मक मार्गदर्शन करुन बालकावर संस्कार करावे आदीसह विविध सामाजिक विषयावर अनेक महिलानी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास सौ. सुनिता इंगोले, ज्योती घोडके, छायाबाई जाधव, सुमन शेंडगे, बाडेवाले असमा, बिसमिल्ला बावासे, किरण शिंदे, सुमन वाघमारे, संगीता राठोड, रोहिणी गायकवाड, सुनिता जाधव, अंजना जाधव आदी महिला उपस्थित होत्या.