उस्मानाबाद : तालुक्यातील बेंबळी ते उमरेगव्हाण-पाटोदा या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सदरील रस्त्याचे काम मंजूर असून मागिल ८ महिन्यांपासून सदरचे काम बंद असल्याने गैरसोयी बरोबरच वाहतुकीला अडथळा होत आहे. या मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी बेंबळीतील युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

 आंध्रप्रदेश,कर्नाटक,या राज्यांसह उमरगा,लोहारा तुळजापूर या तालुक्यांना जाणारा प्रमूख राज्य मार्ग आहे त्यामुळे सतत वर्दळ असते. या मार्गावर साखर कारखानाही असून अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहतूकीला अडचणी येत आहेत. तसेच उमरगा लोहारा जाणा-या बस चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.

 
Top