तुळजापूर : सतीश महामुनी

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन चालू असताना महाराष्ट्रामधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यस्तरीय बैठक तुळजापूर येथे हे होत असल्याने या शेतकरी आंदोलनाबाबत स्वाभिमानी ची कोणती भूमिका राहणार आहे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तुळजापूर येथे तीन फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालय येथे महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिवसभर चालणार आहे या बैठकीमध्ये सोयाबीन पिकावर विमा स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी 100% शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वीज माफी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार आदी विषयावर चर्चा होणार असल्याचे समजले आहेत याशिवाय दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणती भूमिका घेणार आणि पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी या बैठकीमध्ये कोणता संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

सदर बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, उस्मानाबाद जिल्हा प्रमुख रवींद्र इंगळे, डॉ प्रकाश पोफळे नांदेड, रविकांत तुपकर बुलढाणा, पूजा मोरे गेवराई, जालिंदर पाटील कोल्हापूर, संदीप घुगे कोल्हापूर, रसिका ढगे परभणी, गजानन बंगाळे जालना, सत्तार पटेल लातूर, बापूसाहेब कारंडे पुणे, गोरख मोरे पुणे, विजय जाधव लातूर, घनश्याम चौधरी नंदुरबार, प्रकाश वालबंदकर पुणे, बिबीशन घोरटे उस्मानाबाद, ईश्वर गायकवाड उस्मानाबाद या पदाधिकारी यांची उपस्थिती आहेत.

 
Top