तुळजापूर : पोलिओ निर्मूलनासाठी भारत सरकार , युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि जागतिक आरोग्य संघटना याची संघटित महत्वपूर्ण भूमिका आहे मागील 35 वर्ष पासून रोटरी ह्या पोलिओ निर्मूलनाच्या चळवळीत हिरीरीने भाग घेत आहे . रोटरी क्लब तुळजापूर ने पोलिओ डोस देणे साठी पोलिओ बूथ वरती जावून आपले योगदान दिले.
रोटरी क्लब तुळजापूर ने काल रविवार दीं 31/01/2021 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत दर वर्षी प्रमाणे प्रत्यक्ष पोलिओ बूथ वरती जावून तेथील बूथ अधिकारी यांचे व लाभ घेण्यात आलेल्या बालकाला क्लब च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित सर्व बालकांना पोलिओ डोस देण्यात आले.
जगातून पोलिओ हा 100%संपला नसला तरी जवळ जवळ संपन्याच्या पायरीवर आहे पोलिओ ची आता एंड पोलिओ END POLIO कडे वाटचाल सुरू आहे संघटित होऊन सामना केलेल्या या एका विषाणू विरुद्ध हा विजयच आहे असे समजायला हवे.
या प्रसंगी रोटरी क्लब तुळजापूर च्या अध्यक्षा रो ॲड स्वाती नळेगावकर, सचिव निर्मला जाधव, सह सचिव रामचंद्र गिददे, रो.संजय जाधव,बूथ अधिकारी त्यांचा स्टाफ डोस घेण्यास असलेली बालके त्यांचे पालक हजर होते.