उस्मानाबाद, दि.२: 
  अणदुर ता तुळजापूर येथील शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी तज्ञ विधिज्ञांची नेमणूक करुन न्याय देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी याना निवेदन देवुन करण्यात आली आहे.
 दि. 27 जानेवारी  रोजी अणदूर  ता.तुळजापूर येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची दुर्घटना घडली याप्रकरणी नळदुर्ग  पोलीस स्टेशनच्या वतीने दोन आरोपींना अटक झाली असून आणखी एका मुख्य आरोपीस अटक झालेली नाही यासंबंधी पीडित कुटुंबासह अणदूर  ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या आहेत सदरील प्रकरणी पीडित कुटुंबांना न्याय मिळावा याकरिता या प्रकरणाची न्यायालयीन कामकाज निपक्षपातीपणे होणे गरजेचे आहे याकरिता या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया निपक्षपाती होण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम किंवा ॲड. उमेश चन्द्र यादव यांच्यासारख्या तज्ञ विधिज्ञांची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली. 
नितीन काळे, दीपक आलुरे, माणिकराव आलुरे, सोमनाथ शेट्ये, साहेबराव घुगे, उमाकांत आलुरे, दयानंद मुडके, राचप्पा जिडगेश्रीशैल्य लंगडे, महेश कर्पे, शिवकुमार स्वामी, निलेश आलुरे, अनिल स्वामी, नितीन हागलगुंडे, शिवराज नरे, बसवराज नरे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top