चिवरी : राजगुरू साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे सोमवारी दि.१ रोजी श्रीराम मंदिर बांधकामासाठी निधी संकलन रॅली काढण्यात आली होती. या रॅलीच्या माध्यमातून निधी संकलन करण्यात आले.
या रॅलीस गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला तसेच ग्रामस्थांच्यावतीने हनुमान मंदिर ते संपूर्ण गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात प्रभु श्रीरामाच्या नावाचा जय जय कार करत दिंडी काढण्यात आली. या वेळी गावकर्यांनी आपल्या मनोभावे निधी दिला, या निधी संकलन रॅलीच्या कार्यासाठी रामभक्त, भजनी मंडळासह समस्त ग्रामस्थानी परिश्रम घेतले.