उस्मानाबाद,दि.३:
विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून राबवल्या जात असलेल्या 'सुंदर माझे कार्यालय' उपक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून सध्या शासकीय कार्यालयांमध्ये सुंदर माझे कार्यालय या संकल्पनेअंतर्गत सुशोभीकरण, कार्यालयीन दप्तरात नीटनेटकेपणा ठेवला जात आहे. या संकल्पनेचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहालगत वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तूबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ए.व्ही. सावंत, दीपक देशपांडे, वरिष्ठ सहाय्यक मधुकर कांबळे, स्वीय सहाय्यक बलभीम जाधव,बी एस. गाडे आदींची यावेळी उपस्थिती होती.