उस्मानाबाद,दि.३: खेळाडूना पूर्वीप्रमाणे क्रिकेट खेळू देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी शहरातील क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमीं नागरिकानी जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे केली आहे.
उस्मानाबाद जिल्हा क्रीडाधिकारी यांनी दि. २ फेब्रुवारी रोजी अचानक तुळजाभवानी स्टेडियम बाहेर नोटीस लावून क्रिकेट खेळाडूनी क्रिकेट खेळण्यासाठी 11 ते 4 या वेळेत परवानगी असुन इतर वेळी क्रिकेट खेळता येणार नाही अशी नोटिस लावून खेळाडूना क्रिकेट खेळण्या पासून रोखले. याचा निषेध करण्यासाठी आणि खेळाडूना पूर्वीप्रमाणे क्रिकेट खेळू देण्यासाठी परवानगी देण्यात यावी या मागणीचे जिल्हाधिकारी याना निवेदन दिले आहे.
वास्तविक क्रिकेट साठी ईतर कोठेही मैदान उपलब्ध नाही व उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव क्रिकेट खेळाडूनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यंत पोहोचवले आहे, असे असतानाही क्रिकेट बाबत दुजाभाव करून खेळाडूना क्रिकेट खेळण्या पासून रोखणे हे अन्यायकारक आहे. जर आम्हाला क्रिकेट खेळण्या पासून रोखले तर येणार्या काळात खेळाडू आदोंलन करतील.
यावेळी अँड. प्रतीक देवळे, दादा कांबळे, श्याम जहागिरदार, विकास पवार, सचिन लोखंडे, शकीब शेख, नवनाथ डांगे, दिनेश माने आदीसह खेळाडू संख्येने उपस्थित होते.