नळदुर्ग, दि.३ :
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करुन गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळावी व पिडीत कुटुंबाला न्याय देण्याची मागणीचे निवेदन पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत याना लिंगायत सेवा संघाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी लिंगायत सेवा संघाचे मराठवाडा प्रमुख देवराज संगुळगे,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष महादेव पाटिल,हणमंतप्पा शंके सोशल मिडीया प्रमुख महाराष्ट्र,आनंद देशट्टे, तुळजापुर तालुका अध्यक्ष सिद्धेश मुडके, उपाध्यक्ष बाळू मुळे, उमरगा तालुकाध्यक्ष संतोष येवले,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष किरण गायकवाड ,अजय बिराजदार व लिंगायत सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.