नळदुर्ग , दि.३:
राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेच्या नळदुर्ग शहर अध्यक्षपदी ताजोदीन शेख यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल शेख यांचे आभिनंदन केले जात आहे.
यावेळी जेष्ठ नेते खंडू जाधव, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे , विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, विद्यार्थी तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे. समर्थ पैलवान, नितीन रोचकरी, विद्यार्थी शहराध्यक्ष आदित्य शेटे, महेश चोपदार , कार्यअध्यक्ष शरद जगदाळे, अप्पासाहेब पवार, आण्णा क्षीरसागर, तोफिक शेख, अनमोल शिंदे , गोरख पवार, गुड्डू माने, आदीसह कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान नळदुर्ग येथे शहर राष्ट्रवादीच्या वतीने शेख यांचे सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष महेबुब शेख, अंल्पसंख्याक शहर अध्यक्ष अजित जुनेदी , तालुका उपाध्यक्ष बशिर शेख, मिन्ना ईनामदार,खैय्युम सुबेकर,खुदरत शेख,आदी उपस्थित होते.