चिवरी,दि.२४:
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी यात्रा यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय मंदिर कमिटी, पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाच्या वतीने बुधवार दि,२४ रोजी संयुक्त बैठक घेऊन करण्यात आले. यामध्ये श्री महालक्ष्मी देवीचे सर्व धार्मिक विधी रूढी व परंपरा ह्या स्थानिक पातळीवर मोजक्याच मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले जाणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला,
या बैठकीमध्ये तहसीलदार सौदागर तांदळे यांनी यावर्षी दि,२, व ३ मार्च रोजी भरणारी महालक्ष्मी यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यात्रा काळामध्ये मंदिर बंद ठेवून व बाहेर गावातील भाविकांनी घरातच राहुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस तहसीलदार सौदागर तांदळे , नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जगदीश राऊत, सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, सोसायटीचे बालाजी शिंदे, ग्रामसेवक गोरबा गायकवाड, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, तलाठी डी. एन. गायकवाड, मंदिर कमिटीचे अध्यक्ष. जयपाल सिंह बायस, ज्ञानदेव झिंगरे, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे, धनराज कोरे,कल्याण स्वामी,मोतीराम चिमणे , गोविंद शिंदे, शंकर झिंगरे, दादाराव शिंदे, मारूती काळजते, बबन काळजाते, धनराज मिटकरी, लक्ष्मण कोरे, यांच्यासह ग्रामस्थ व्यापारीवर्ग व पत्रकार उपस्थित होते.
यात्रा काळामध्ये चिवरी महालक्ष्मी मंदिर बंद असल्यामुळे गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी घरीच देवीच्या प्रतिमेचे प्रतिष्ठापना करून पूजाअर्चा नैवेद्य दाखवून यात्रा साजरी करावी असे आव्हान ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.