उस्मानाबाद,दि.२४ : 
तालुक्यातील बेंबळी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.


बेंबळी येथील रहिवासी असलेले वैभव गोविंद शिडूळे व सुरज राजेंद्र जाधव यांनी वेरूळ (औरंगाबाद) येथे झालेल्या सीनियर, ज्युनियर, सबज्युनियर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत अनुक्रमे सिल्वर व ब्राँझ मेडल मिळवले. यांची पंजाब येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोघांचा ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच नितीन इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 यावेळी ग्रामविकास अधिकारी करपे, ग्रामपंचायत सदस्य नवाब पठाण, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक संतोष आगलावे, सामाजिक कार्यकर्ते विष्णूआप्पा निकम, विश्वजीत बरडे सर, अजित माने, दादा वाघे, मारुती कस्पटे, हनुमंत इंगळे, आकाश पाटील, आकाश मुंगळे, अभय डोणे, ग्रामपंचायत कर्मचारी निळकंठ रेडेकर, नेताजी माने आदी उपस्थित होते.
 
Top