नळदुर्ग, दि.२४
माहेरहुन सुसंस्काराची शिदोरी घेवुन काही महिन्यापुर्वी सासरी नांदवयास गेलेल्या नळदुर्गच्या कन्येने सासरी ग्रामपंचायत निवडणुक लढवुन विजयी होवुन उपसरपंचपदी वर्णी लागली. त्यामुळे कमी वयात उपसंरपचपदी झेप  घेण्याचा बहुमान मिळविणा-या या कन्येचा नळदुर्गवासियानी जल्लोष करीत थाटात गौरव सोहळा साजरा केला.
 
नळदुर्गचे  माजी न.प.सदस्य सुधीर हजारे यांची विवाहित मुलगी सौ. सपना शंकरसिंह चव्हाण यांची अमरावती जिल्ह्यातील हातुर्णा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याने  शहरवासियांच्या व हजारे कुंटूंबियाच्यावतीने गौरव करण्यात आला. 

  नळदुर्ग शहरातील  सुधीर हजारे यांच्या मुलीचे सासर विदर्भातील हातुर्णा जि. अमरावती हे गाव असुन नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत  सपना चव्हाण ह्या  मंत्री बच्चु कडू यांच्या प्रहार या पक्षाकडून निवडणुक लढवुन  विजयी  झाल्या. त्यानंतर  त्यांची थेट हातुर्णा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली.  

 
नळदुर्ग येथे  माहेरी आलेल्या सपना शंकरसिंह चव्हाण यांचा  हजारे परिवार, महाराण प्रताप तरुण गणेश मंडळ,शहर पत्रकार संघ, शिवशाही तरुण मंडळ, व शहरवासियांच्या वतीने सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात  आले.
यावेळी अनेकानी  मनोगत व्यक्त करुन आभिनंदनपर मार्गदर्शन   केले आहे.


नगरसेवक नितीन कासार, बसवराज  धरणे , महालिंग स्वामी, विनायक अहंकारी , सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक संजय बताले,  सरदारसिंग ठाकुर,  शिवसेनेचे शहर प्रमुख  संतोष पुदाले,  विलास येडगे,शिवाजी नाईक , सुहास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बणजगोळे ,दिपक जगदाळे, दादासाहेब बनसोडे, अय्युब शेख , अमर भाळे ,अझहर जहागिरदार, रणजितसिंग ठाकुर, राजेंद्र महाबोले, भाजयुमोचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार , मनिषसिंह हजारे, राहुल हजारे, सोसायटीचे चेअरमन सुरेश हजारे, शुभम हजारे, महेश हजारे, संदिप हजारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष  महेबुब शेख, डॉ. अंबेडकर इंग्लिश स्कुलचे संस्थापक मारूती खारवे, राजेंद्र महाबोले, राजेंद्र काशिद, रघुनाथ नागणे, उदयोजक मनिष हजारे, सागर हजारे आदीसह शहरातील विविध मंडाळाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते. कार्सुयक्ञरमाचे संचालन व  प्रास्ताविक विनायक अंहकारी,आभार सुधीर हजारे यानी मानले.
 
Top