वागदरी,दि .२४,एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिण मंदिर समितीच्या वतीने जया एकादशीचे औचित्य साधून टाळ मृदंगाच्या तालावर, हरीनामाचा गजर करीत वारकऱ्यांनी गावात पायी दिंडी काढुन पारंपारिक पद्धतीने विविध धार्मीक कार्यक्रम उत्साहात साजरे केले.
थोर संताच्या माध्यमातून महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला असून समाजप्रबोधनाचे फार मोठे कार्य वारकरी मंडळाकडून अविरतपणे चालू आहे, चालू राहणार आहे, यात शंका नाही.
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथेही गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासला जातोय .जया एकादशी निमित्ताने वारकऱ्यांनी गावात पारंपरिक पद्धतीने पायी दिंडी काढून विविध धार्मिक कार्यक्रम केले.