चिवरी/नाईचाकुर, , दि.१२ 
उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील ग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेसचे चंद्रकांत स्वामी तर शिवसेनेचे उपसरपंचपदी बालाजी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली, 

येथील सरपंचपद हे मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते, यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपा यात चुरशीची लढत झाली, यामध्ये महाविकास आघाडी ला घवघवीत यश आले. सरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते पण भाजपचे तानाजी काळे यांनी ऐन वेळेस माघार घेतली. त्यामुळे सरपंचपदी काँग्रेसचे चंद्रकांत स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी केवळ एकमेव बालाजी पवार यांचा अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली, यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर आर गायकवाड, विस्ताराधिकारी उमरगा व ग्राम विकास अधिकारी प्रभाकर नलावडे यांनी काम पाहिले .

यावेळी ग्रामपंचायत सदस्य उमादेवी बाळू स्वामी, जयश्री सचिन पाटील, बालाजी ईटुबोने ,दैवशाला पांचाळ, मिरा कांबळे ,तानाजी काळे, उषा बालाजी पवार, बालाजी काशिनाथ पवार, कौशल्या सिद्धेश्वर पवार, प्रणिता प्रदीप पवार, चंद्रकांत स्वामी, संजय विश्वंभर कांबळे आदींसह सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top