नळदुर्ग,दि.१२ : एस.के.गायकवाड
जगातील सर्वात मोठा श्रीमंत व्यक्ती किंवा गरीब व्यक्ती आपला म्रुत्यु रोखु शकत नाही. तेंव्हा माणसाने आपल्याला मिळालेल्या जीवनात नेहमी कुशल कर्म करून आनंदी जीवन जगावे आशी शिकवण तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा बौद्ध धम्म देतो तेंव्हा भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेल्या सदधम्माच्या मार्गाने आपण आपले जीवन आनंदाने व्यतीत करावेअसे असे प्रतिपादन बुद्ध लेणी खरोसा ता.औसा येथील पूज्य भन्ते सुमेधजी नागसेन यांनी नळदुर्ग ता.तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
डॉ.आंबेडकर इंटर नँशनल इंग्लिश मेडीअम स्कुल नळदुर्ग, ता.तुळजापूरचे संस्थापक आध्यक्ष मरूती खारवे यांच्या मतोश्री कालथित सिताबाई सुदाम खारवे यांच्या दु:खद निधनाबद्दल जलदान विधी निमित्ताने धम्मदेशना (प्रवचन) व श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी भन्ते बोलत होते.
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कालकथित सिताबाई खारवे यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.
नगरसेवक विनायक अहंकारी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कल्पना गायकवाड, रिपाइंचे अरुण लोखंडे, सहशिक्षक भैरवनाथ कानडे, मारुती बनसोडे आदींची श्रध्दांजलीपर भाषणे झाली.
यावेळी रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड जयभीम वाघमारे, बाबुराव बनसोडे, डॉ. सतिश खारवे,नागनाथ दुपारगुडे, पत्रकार विलास येडगे,अमर भाळे,बौध्दाचार्य दादासाहेब बनस़ोडे,विश्वंभर कांबळे आदीसह शोकाकुल ग्रामस्थ, महिला, नातेवाईक, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.