नळदुर्ग , दि.१२ :  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात राबविण्यात आलेल्या शौचालय योजनेचा नगरपालिकेकडून प्रोत्साहन हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्याची मागणी मनसेच्यावतीने पालिका प्रशासनाकडे निवेदनाव्दवारे करण्यात आली.

 नळदुर्ग नगरपलिकेच्या माध्यमातून घर तेथे शौचालय ही योजना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आली होती,यामध्ये जवळपास बाराशे लोकांनी अर्ज दाखल केले होते,त्यात ९० टक्के लोकांना मंजुरी मिळाली . त्यांना  बारा हजार रुपये  इतके अनुदान दोन टप्यात देण्यात आले, व पालिकेकडून प्रोत्साहन म्हणून ३ हजार रुपये  इतके अनुदान देण्याचे ठरले होते,परंतु अजूनही लाभार्थीना ही प्रोत्साहन रक्कम मिळाली नाही,

वास्तविक पाहता शौचालय बांधून अनेक महिने झाले अनेकांना दुसरा हप्ता सुद्धा मिळाला नाही, अशी तक्रार मनसेचे पदाधिका-याकडे लाभार्थीनी केली आहे, या योजनेत केंद्र सरकार ७५ टक्के व राज्य सरकार २५ टक्के अशी मिळून १२ हजार रुपये इतके अनुदान व पालिकेच्या वतीने प्रोत्साहन म्हणून लाभार्थ्यांना ३ हजार रुपये इतके अनुदान मिळणार अशी ही योजना आहे,तरी ही अनेकांना दुसरा व तिसरा हप्ता मिळाला नाही म्हणून ते अनुदाना पासून वंचीत आहेत, वास्तविक पाहता इतर पालिकेने त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून ५हजार,३ हजार,२हजार ५ पाचशे अशी रक्कम वितरित केली आहे. 


या योजनेला ४-५ वर्ष होत असून अनेकांनी शौचालय बांधून तयार केलेले असताना ही व पालिकेचा ठराव आसताना सुद्धा ही रक्कम लाभार्थ्यांना का देत नाही हा प्रश्न केला आहे व तात्काळ ही प्रोत्साहन रक्कम व ज्यांना दुसरा हप्ता मिळाला नाही अशा लाभार्थीना हे अनुदान वितरित करावे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,निवेदनावर जिल्हा सचिव  ज्योतीबा येडगे, शहराध्यक्ष  अलिम शेख, शहर सरचिटणीस  प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष  रमेश घोडके,आवेज इनामदार यांनी स्वाक्षरी केली आहे.
 
Top