नळदुर्ग ,दि.१२
हगलूर ता. तुळजापूर येथे स्वच्छता अभियानास सुरुवात झाली असुन
गावक-यानी आठवड्यातून एकदा तरी श्रमदान केले पाहिजे,असे नुतन सरपंच ॲड जयपाल पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तुळजापूर तालुक्यातील हगलुर येथे माझा गाव सुंदर गाव अभियानाला ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छता करून उत्साहात सुरुवात केली आहे. गावात स्वच्छता राखणे आणि गावांमध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे, या अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय सुंदर बनवणे, आरोग्य विषयी सुधारणा करणे, पर्यावरण व वृक्षसंवर्धन करणे आदी बाबींचा समावेश आहे.
यावेळी सरपंच जयपाल पाटील, उपसरपंच महेश गवळी, संजय पवार, ग्रामसेवक कदम ए. एम, मुबारक सय्यद, दिगंबर गवळी, औदुंबर घुगे, सौ, मैदाबाई घुगे, सौ आशाबाई घुगे, सौ शीतल घुगे सौ कौशलबाई घुगे, जयकुमार घुगे, मनोज घुगे, दत्ता घुगे, अण्णा घुगे, सोपान गवळी, महादेव जाधवर, संपत घुगे, दाजी घुगे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.