रेडा, दि. १२:  संतोष भोसले       
भोडणी  ता इंदापुर  येथील भोडणी ग्रामपंचायतीवर सरपंचपदी  भाजपच्या धनश्री संतोष जगताप तर उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मल्हारी रामचंद्र लोखंडे याची निवड करण्यात आली.

येथिल ग्रामपंचायत निवडणूक जानेवारी २०२१ मधे झाली. यामधे भारतीय जनता पार्टीला ६ तर  राष्ट्रवादीला ३ असे जागा  मिळाले. 

 भोडणी ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता प्रस्थापित झाली. पण भाजप मधील ६ पैकी २ सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३  सदस्यांना सत्ता स्थापण्यासाठी साद घातली याची चाहूल उर्वरित भाजपच्या  ४ सदस्यांना लागताच या भाजप सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १ सदस्याला भेटून गावात भाजप व राष्ट्रवादी असे संमिश्र सत्ता बनवली व फुटीर सदस्यांना त्यांची जागा दखवुन दिली.


   दि १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपसरपंच निवडीची बैठक घेतली. 

यावेळी भोडणी ग्रामपंचायतीवर सरपंचपदी  भाजपच्या धनश्री संतोष जगताप तर उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मल्हारी रामचंद्र लोखंडे याची निवड झाली. तालूक्यात माञ भोडणी गावात भाजपची एक हाती  सत्ता असताना राष्ट्रवादी ची मदत का घ्यावी लागली  याची  चर्चा  जोरदार  ग्रामस्थात रंगली  आहे. 

 
 
Top