वागदरी,दि.१३:एस.के.गायकवाड
माझा गाव सुंदर गाव स्वच्छ गाव हा संकल्प करत वागदरी ता.तुळजापूर येथे माझा गाव सुंदर गाव या आभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
जि.प.उस्मानाबाद अंतर्गत जिल्हाभर चालू असलेल्या माझा गाव सुंदर गाव या आभियानाला प्रतिसाद देत वागदरी येथे सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, यांच्या हस्ते ,जिवनाच्या आखेर पर्यंत स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करून या आभियानाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे,ग्रामसेवक जी.आर.जमादार, रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, ग्रा. प.सदस्य विद्या बिराजदार, बकुलाबाई भोसले, कमलबाई धुमाळ, दत्ता सुरवसे, महादेव बिराजदार, रोजगार सेवक रामसिंग परिहार, पोष्टमन यशवंत यादव, प्रेमनाथ माडजे ,सिंधूताई बिराजदार यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी शासनाच्या उमेद आभियाना अंतर्गत असलेल्या येथील राणी लक्ष्मीबाई महिला ग्रमसंघानेही या आभियानात सहभाग घेतला.