उस्मानाबाद,दि.१५ : येथील राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भाई धनंजय उध्दवराव पाटील यांना रविवारी(14 रोजी) सांगली जिल्ह्य़ातील हनमंतवडिये ता.कडेपूर येथे क्रांतिवीर भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
हा कार्यक्रम हनमंतवडीये ता.कडेगाव येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते तर आमदार अनिलराव बाबर यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला.या वेळी क्रांति विरांगणा हौसाताई पाटील यांनाही भाई उध्दवराव पाटील जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
९५ व्या वाढदिवसानिमित्त हौसाताई पाटील यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.या कार्यक्रमात भाई धनंजय पाटील,मंत्री बाळासाहेब पाटील,आ.अनिल बाबर आदींनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी अॕड सुभाष पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.उत्कष पाटील व किमया पाटील यांनी सुत्रसंचालन केले.सागर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.