चिवरी , दि.१५
 तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे माझा गाव सुंदर गाव अभियानाला ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छता करून उत्साहात सुरुवात केली आहे.

 गावात स्वच्छता राखणे आणि गावांमध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे, या अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय सुंदर बनवणे, आरोग्य विषयी सुधारणा करणे, पर्यावरण व वृक्षसंवर्धन करणे आदी बाबींचा समावेश आहे. यासाठी ग्रामस्थांनी स्वच्छतेची शपथ घेत अभियानाला सुरुवात केली व तसेच गाव परिसर स्वच्छ करण्यात आला,

 यावेळी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, पोलीस पाटील रुपेश बिराजदार,ग्रामसेवक गोरोबा गायकवाड,वि.सो.चेअरमन बालाजी शिंदे, माजी सैनिक विठ्ठल होगाडे, शंकर झिंगरे,आशा कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी आदीसह ग्रामस्थांनी या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता
 
Top