जळकोट,दि.१५:   जळकोट तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामपंचायतमध्ये बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रथमतः सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.


यावेळी बंजारा समाजाच्यावतीने जळकोट ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व  ‌सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन राजु पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत पाटील, महेश कदम, अर्जुन कदम,अप्पु स्वामी , पिन्टु चुंगे , महादेव सावंत ,ग्रा.प.सदस्य अंकुश लोखंडे, जीवन कुंभार, कल्याणी साखरे , संजय माने, सय्यद तांबोळी, लखन चव्हाण ,राजु चव्हाण, वसंत चव्हाण, सुधाकर राठोड, राजू राठोड, लोकु राठोड, सुर्यकांत राठोड, शंकर वाडीकर, विजय यादगौडा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
 
Top