तुळजापूर, दि. १५ :
तुळजापूर शहरालगत असणाऱ्या डोंगर परिसराला आग लागल्यामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, वनविभाग आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केले.
नळदुर्ग रोड वरील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या नजीक असणाऱ्या डोंगर परिसरात सुमारे वाळलेले झाडे आणि गवत याला आग लागली, आगीमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांनी जोपासलेल्या शंभर झाडांचे नुकसान झाले आहे, या आगीमध्ये पशु पक्षी आणि प्राणी आगीत भस्मसात झाले. दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले .मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा नष्ट होऊन जोपासलेल्या झाडांचे नुकसान झाले.
तुळजापूर नगरपरिषदेच्या अग्निशामक गाडी च्या माध्यमातून आगीवर पाण्याचा फवारा मारण्यात आला त्याच बरोबर समाजसेवक पंकजा शहाणे यांनी ही आग विझवण्यासाठी मदतकार्य केले, प्राचार्य डॉ. मोहन बाबरे आणि उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन आग विझवण्यासाठी दोन तास प्रयत्न केले.
वन विभागाचे वनरक्षक व्ही आर राठोड आणि बी टी मोरे यांच्यासह इतर कर्मचारी यावेळी उपस्थित झाले. मागील दहा दिवसांमध्ये या डोंगरांमध्ये दोन वेळा आग लागण्याचे प्रकार झाले आहे . त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन विभागाने लावलेल्या झाडांची नासधूस झालेली आहे.