तुळजापूर, दि. १५ :
तुळजापूर शहरामध्ये राजा कंपनी तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने गणपतीची मिरवणूक काढण्यात आली.
श्रीमंत राजयोगी गणपती गणेश जयंती निमित्ताने राजा कंपनी तरुण मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक सज्जन साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या धार्मिक कार्यक्रमांमध्ये आप्पा माने, भैया जाधव, लालासाहेब तांबोली, सुरेश नेपते, सुरेश आकुडे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून श्रीमंत राजयोगी गणपती म्हणजे पावणारा गणपती नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गणपती उत्सवासाठी तुळजापूर शहरातील नागरिक सहभागी होते .
याशिवाय तुळजापूर शहरातील उस्मानाबाद रोडवर असणाऱ्या इच्छापूर्ती गणपती मंदिरामध्ये
परिसरातील महिलांच्या उपस्थितीमध्ये सकाळी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. गणेश भक्त अरुण तोडकरी आणि त्यांचे सहकारी यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती.