अणदूर दि.२ :
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील सामुहिक अत्याचार पिडीत अल्पवयीन शाळकरी मुलगी व तिच्या कुटुंबियांची भारतीय जनता पार्टीच्या महिला राज्य उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भेट घेतली .
मंगळवार दि.२ रोजी भाजपच्या राज्य महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पिडीतेची व कुटुंबीयाची भेट घेतली.त्यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड .अनिल काळे
जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे ,भाजपा महिला माजी जिल्हाध्यक्ष क्रांती थिटे, दत्ता कुलकर्णी, ,विशाल रोचकरी आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती वाघ यांनी पिडीता व कुटुंबियांची चौकशी करुन व्यथा जाणून घेत सहवेदना व्यक्त करीत आरोपिंना कठोर शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नसल्याचे सांगितले.एक आरोपी सापडत नसल्याचे सांगताच सापडत कसा नाही? याचा जाब मी पोलीस व सरकारला विचारणार असून सर्व दोषींना शिक्षा मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.