नळदुर्ग, दि. ३: विलास येडगे
अणदुर ता.तुळजापूर येथील पीडितेस योग्य न्याय देण्याबरोबरच या घटनेतील आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी नळदुर्ग शहर लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली . याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे नमुद केले आहे की, तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे घडलेल्या सामुहिक अत्याचार प्रकरणाचा नळदुर्ग शहर लिंगायत समाजाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. त्याचबरोबर शासनाकडे खालीलप्रमाणे आमच्या समाजाच्या मागण्या आहेत.
या सामुहिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीस तात्काळ अटक करावे ,सदरील पीडितेस व कुटुंबास योग्य ते संरक्षण द्यावे , सदरील प्रकरणात सरकारी वकील म्हणुन ॲड.उज्वल निकम यांची तात्काळ नियुक्ती करावी , सदर प्रकरणी निपक्षपातीपणे चौकशी करुन आरोपींवर कठोरातील कठोर शासन व्हावे.
या मागण्यांची दोन दिवसात अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. हे निवेदन देण्यासाठी शहरातील भवानी चौक ते पोलिस ठाण्यापर्यंत काळ्या फिती लाऊन लिंगायत समाज बांधव पोलिस ठाण्यात गेला. यावेळी सुकन्या शिवय्या स्वामी व समृद्धी सिद्धाराम मानशेट्टी या पाच वर्षीय चिमुरडींच्या हस्ते सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर न.प.च्या बांधकाम समितीचे सभापती बसवराज धरणे, माजी नगरसेवक संजय बताले, नगरसेवक महालिंग स्वामी, ॲड.अरविंद बेडगे, दयानंद स्वामी, विवेकानंद स्वामी, राजकुमार पिचे, काशिनाथ कलशेट्टी, खंडप्पा कोरे, सुभाष कोरे, राजकुमार खद्दे,दिनेश बारुळकर, संजय स्वामी, निलय्या स्वामी, विरभद्र स्वामी, धनराज धरणे, राजप्पा जिडगे, शिवय्या स्वामी, सुभाष बुट्टे, सागर कलशेट्टी, सचिन बेडगे,महादेव हत्ते, राजशेखर कलशेट्टी, सोमनाथ कसेकर, युवराज साखरे, सिद्धप्पा थोंटे,सोमनाथ कलशेट्टी, संतोष बताले, महेश बेडगे, केदार बताले,ओंकार शिरगुरे, अमोल संजय मुळे, रविराज तमशेट्टी,सचिन स्वामी, गणेश मुळे, संजय अप्पाराव बेडगे, बसवेश्वर कलशेट्टी,सोमनाथ म्हेत्रे, विजयकुमार तमशेट्टी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.