आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालक यांना महाराष्ट्र एस.टी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन मिळावे, या मागणीसाठी मुबई येथिल आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले आहेत.
राज्यातील सुमारे 29 हजार ग्रामपंचायती 351 पंचायत समित्या व 34 जिल्हा परिषद कार्यालयामध्ये संग्राम व आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सुमारे 15,000 संगणक परिचालक काम करत आहेत. सहा कोटी ग्रामीण जनतेच्या शासनाच्या योजना असून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्याचे काम संगणक परिचालक आज करीत आहेत. महाराष्ट्र शासन प्रशासन व ग्रामीण जनता यांच्यातील दुवा म्हणून हे काम करतात याकडे सरकारने लक्ष वेधून राज्य सरकारने संगणक परिचालक यांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र संगणक परिचालक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
दि. 18 सप्टेंबर 2019 रोजी सरकारने आपले सरकार प्रकल्पातील सर्व संगणक परिचालक यांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाने गठीत केलेल्या समितीने शिफारस केल्याप्रमाणे सुधारित आकृतिबंध अनुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याची मागणी केली आहे. यासाठी परिचालक यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. अशी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.